महत्वाच्या बातम्या

 खाजगी रुग्णालयांमध्ये क्षयरुग्णांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सन २०२५ पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे शासनाचे लक्ष आहे. यासाठी सर्व खाजगी रुग्णालय व चिकित्सा संस्थांना क्षयरुग्णांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. नोंदी न ठेवल्यास  आयपीसीनुसार क्षयरोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत म्हणून कारवाई पात्र राहणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पॅथ लॅब, रुग्णालय, डॉक्टर व क्षयरोग संबंधित औषधी विक्रेत्यांना राज्य सरकारच्या आरोग्य विभागामध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्या क्षयरुग्णांचा उपचार झाला आहे. त्यांच्या सुध्दा नोंदी ठेवणे गरजेचे आहे. जर क्षयरुग्णांच्या नोंदी ठेवल्या नाही तर आयपीसी कलम २६९ व २७२ नुसार क्षयरोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत म्हणून कारवाईसाठी पात्र राहील.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत ३१ मार्च पर्यंत होय आपण टीबी संपवु शकतो अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग उच्चाटन करण्यासाठी विविध पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यस्तरावरुन आलेल्या चमूने खाजगी क्षेत्रास भेटी देऊन अशा सूचना दिल्या आहे. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रामध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत असून या दरम्यान  जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये लक्षणिय घट, छातीमध्ये वेदना इत्यादी लक्षणाची तपासणी करण्यात येत आहे.

सरकारी रुग्णालयामध्ये अशा रुग्णांचा निशुल्क उपचार करण्यात येईल. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना नियमित  औषधी दिली जाईल. सरकारी नोंदणीमध्ये क्षयरुग्णांची माहिती नोंद केली जाईल. क्षयरुग्णांना पोषण आहार मिळू शकेल यासाठी स्थानिक संस्था, व्यावसायिक संस्था व समाजकार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यामध्ये अक्षय मित्र यांची मदत घेऊन क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे काम सुरु असून सन २०२५ पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष आहे, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos