महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२९ मार्च महत्वाच्या घटना

१८५९ : ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

१८५७ : बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

१९३०: प्रभात चा खूनी खंजिट हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९६८ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

१९७३ : व्हिएतनाम युद्ध- व्हिएतनाम मधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

१९८२ : एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

२०१४ : इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.

१९४२ क्रिप्स योजना जाहीर

२९ मार्च जन्म

१८६९ : दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू : १ जानेवारी १९४४)

१९१८ : वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू : ५ एप्रिल १९९२)

१९२६ : अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू : २१ मार्च २०१०)

१९२९ रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू : १९ ऑगस्ट १९९३)

१९३० : मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.

१९४३ : इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.

१९४८ साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.

२९ मार्च मृत्यू

१५५२ शिखांचे दुसरे गुरु गुरु अंगद देव यांचे निधन. (जन्म : ३१ मार्च १५०४)

१९६४ : इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.

१९७१ बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म : २ नोव्हेंबर १८८६)

१९९७ सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म : ११ सप्टेंबर १९१५)





  Print






News - todayspecialdays




Related Photos