गोठणगाव वनपरिक्षेत्रात बिबट वन्यप्राण्याचे शिकार : आरोपी व गुन्ह्याचा तपास सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
गोंदिया वन विभागातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील केळवद (ता.अर्जुनी/मोर) येथील कक्ष क्रमांक २३३ नियतक्षेत्र जांभळी-१ येथे अज्ञान आरोपीने बंदुकीने गोळ्या झाडून वन्यप्राणी बिबट मादी वय अंदाजे दोन ते अडीच वर्षाची शिकार करुन बिबटाचे चारही पायाचे पंजे कापून नेल्याचे आढळून आले. याबाबत प्रथम रिपोर्ट क्रमांक १७५/२१ , दिनांक १५ डिसेंबर रोजी वन्यजीव (वनसंरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत वन गुन्हा नोंदविला आहे.  पशुवैद्यकीय अधिकारी नवेगाव-नागझिरा, व्याघ्र प्रकल्प व पशुवैद्यकीय अधिकारी धाबेपवनी यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन मानद वन्यजीव रक्षक गोंदिया व वन अधिकारी यांचे समक्ष केले. सदर बिबट्याचा मृत्यू बंदुकीची गोळी हृदय व फुप्फुसातून आरपार गेल्याने मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय
अधिकारी यांनी शवविच्छेदनात स्पष्ट केले. सदर दोन्ही गोळ्या सील करण्यात आल्या असून फॉरेंसिक प्रयोगशाळेत पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे. शवविच्छेदनानंतर स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसीजर नुसार कार्यवाही करण्यात आली. आरोपी व गुन्ह्याचा तपास सुरु आहे. असे उपवनसंरक्षक, गोंदिया वन विभाग, गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  Print


News - Gondia | Posted : 2018-12-21


Related Photos