प्रसादातून विषबाधा होऊन १५ भाविकांचा मृत्यू : मंदिराच्या साधूसह चौघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / म्हैसूर :
कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात सुलवाडी येथील किचीगुत्तू मारम्मा मंदिरात प्रसादातून विषबाधा होऊन १५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी  पोलिसांनी  मंदिराच्या एका कनिष्ठ साधूसह एकूण चौघांना अटक केली आहे.  इम्मादी महादेव स्वामी ऊर्फ देवण्णा बुद्धी (५२ वर्षे), अंबिका (३२), तिचा पती महादेवस्वामी ऊर्फ मडेशा (४६) आणि दोद्दा थम्माडी ऊर्फ दोद्दय्या (३५) अशी आरोपींचे नावे आहेत .
प्राप्त माहितीनुसार ,देवण्णा बुद्धी हा सुलवाडी मारम्मा मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे, तर मडेशा हा व्यवस्थापक व दोद्दय्या माजी कर्मचारी आहे. शरत कुमार म्हणाले की, मंदिर ट्रस्टचे बहुसंख्य विश्वस्त ज्येष्ठ साधू गुरुस्वामी यांचे पाठीराखे आहेत. कनिष्ठ स्वामी देवण्णा याचे केवळ मंदिर ट्रस्टचाच नव्हे तर सलूर मठाचाही अध्यक्ष होण्याचे मनसुबे होते; पण विश्वस्त गुरुस्वामींच्या विश्वासातील असल्याने त्याचा या वरिष्ठ स्वामींवर राग होता. त्यामुळे त्याने त्यांना बदनाम करण्याचे हे कारस्थान रचले.  
 तपासातून उघड झालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी असा दावा केला की, गोपूरपूजनाच्या धार्मिक विधींमध्ये गुरुस्वामींसोबत सहभागी न होता देवण्णा स्वयंपाकाच्या ठिकाणी घुटमळत राहिला. वीरण्णा, लोकेश व पुत्तुस्वामी हे तीन आचारी स्वयंपाक करीत होते.  वीरण्णा आंघोळ करायला गेल्यावर देवण्णाने लोकेश व पुत्तुस्वामी यांना ‘गुरुस्वामींना काय हवे ते नको पाहण्यासाठी तिकडेच थांबा’, असे सांगून पिटाळले. वीरण्णा आंघोळ करून परत येईपर्यंत वीरण्णाने अंबिका, दोयय्या व व मडेशा यांना हाताशी धरून आपले कारस्थान पार पाडले. कोणी पाहत नाही ना याकडे लक्ष ठेवण्याचे काम मडेशाने केले व अंबिका आणि दोदय्या यांनी चुलीवर उकळत असलेल्या टोमॅटोच्या सारामध्ये कीटकनाशक मिसळले.  Print


News - World | Posted : 2018-12-21


Related Photos