प्रलंबित प्रकरणांना गती दयावी : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : अनुसूचीत जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत प्रलंबित प्रकरणाना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी २८ मार्च २०२३ ला घातलेल्या बैठकीत दिले. या बैठकीला सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, शासकीय वकील मैथीली काळविट, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या बैठकीतील इतीवृत्ताची माहिती सहायक आयुक्त श्री.देशमुख यांनी यावेळी दिली. सन २०२०-२१ व २०२२-२३ या दोन वर्षाचे १२ प्रकरणे प्रलंबित असुन त्यापैकी ३ प्रकरणात देाषारोप अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले असून केस क्रमांक प्राप्त होणे बाकी असून ९ प्रकरणे पोलीस तपासावर असल्याने प्रलंबित असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. तालुक्यावार दक्षता व नियंत्रण समितीच्या नियमीत बैठका होत असल्याची माहिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
News - Bhandara