अल्लीपूर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
फिर्यादी मित्रासह  दुचाकी वाहनाने राळेगाव येथील दर्ग्यावर दर्शन करुन कापसी मार्ग वर्धेकडे जात असता कात्री फाटयाजवळ काही अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीच्या समोर चारचाकी वाहन लावून त्यांना अडविले व त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व मुद्देमाल लुटून नेला . याबाबत फिर्यादीने पो.स्टे. अल्लीपुर येथे गुन्हा नोंदविला असता पोलिसांनी तपासचक्र फिरवून ३ संशयिताना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली . प्रशांत गुलाबराव बोरकर (३७),विलास सुधाकर सेलकर (३१) ,विनोद शामराव ढोले (४४) रा. सिरसगाव असे आरोपींचे नाव असून त्यांच्याकडून ६ लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले . 
दिनांक १८ जून २०१८ रोजी फिर्यादी, शाहीद अकरम खान रा .  गाडगेनगर मसाळा, जि.वर्धा हे आपल्या मित्रासह ऍक्टिवा गाडीने राळेगाव येथील दग्र्यावर दर्शन करुन कापसी मार्ग वर्धेकडे जात असता कात्री फाटयाजवळ मागाहुन पांढऱ्या रंगाच्या अनोळखी इंडीका गाडीने ओव्हरटेक करुन गाडी आडवी करुन फीर्यादीची मोटार सायकल थांबवीली व इंडीका गाडीतुन ३ अनोळखी इसम ३० ते ३५ वर्ष वयोगटातील खाली उतरुन फीर्यादी जवळ गेले, काही न बोलता फिर्यादीस व त्याच्या मित्रास लाथाबुक्याने मारहान केली व तसेच एका इसमाने गाडीतुन लोखंडी टाॅमी काढ असे म्हणुन पुन्हा मारण्याचा धाक दाखवून दुसऱ्या इसमाने जबरीने फीर्यादीेचे पॅन्टचे खीशातील १३००/- रु. काढुन घेतले तसेच गळयातली एक सोण्याची चैन वजन १४ गॅ्रम की ३५ हजार  रु. ची ओढुन हिसकावून घेतली व हाताबुक्यांनी मारहान करुन जबर जखमी करुन एकुन जु. कि. ३६३०० /- रु. चा माल जबरीने हीसकावून नेला . अशा फिर्यादिचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. अल्लीपुर येथे १८१/१८ कलम ३९४ , ३४ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्था.गु.शा वर्धा येथील पथकाने केला असता मुखबिरकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरून आरोपींना ताब्यात घेवून सविस्तर विचारपूस केली असता सदर गुन्हा केल्याचे कबुल केले व त्यांचेकडुन गुन्हयात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन ६ लाख  जप्त करण्यात आले.  
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश  ब्राम्हणे, स्थागुशा , वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. पंकज पवार, महेंद्र इंगळे व गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचारी स.फौ. अशोक साबळे, पो.हवा. राजेंद्र ठाकूर, दिनेष कांबळे, परवेज खान ना.पो.शि. रामकृष्ण इंगळे, कुलदिप टांकसाळे, भुशन पुरी सर्व नेमणूक स्था. गु. शा. वर्धा यांनी केली.

   Print


News - Wardha | Posted : 2018-12-20


Related Photos