महत्वाच्या बातम्या

 दुचाकींचा भीषण अपघात : दोन ठार तर एक जण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : गोंडपीपरी तालुक्यातील विठलवाडा येथे दोन दुचाकींचा भीषण अपघातात झाल्याची घटना उघटकीस आली आहे. घटनास्थळी दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. 

सदर घटना २७ मार्च २०२३ ला दुपारी १:00 वाजताच्या दरम्यान घडली असून अपघातात राकेश जधुनाथ अधिकारी (३०) ठाकुर नगर ता. चामोर्शी जि. गडचिरोली, अमोल नैताम मु. बेलगटा चारगाव ता. सावली जि. चंद्रपूर (२७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर नितेश दामोदर कोवे (२७) मु. चारगाव ता. सावली जि. चंद्रपूर हा गंभीर जखमी असून ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचार सुरू आहे.

माहितीनुसार आष्टी व गोंडपिपरी अशा विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणारे दुचाकी क्रमांक MH 40 BU 9878 व MH 34 CB 5972 या दोन दुचाकीचे अनियंत्रित होऊन दोघांनीही एकमेकांना जबर धडक दिले. त्यामुळे यात भीषण अपघात घडला.

सदर घटनेची माहिती मिळतात गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस पथकासह घटनास्थळ गाठून मृतकांचे शव ताब्यात घेत जखमी युवकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos