विदर्भात किटाणूजन्य आजारांचे सावट, स्वाइन फ्लूच्या विषाणूची बाधा होऊन २० मृत्युमुखी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
वातावरणातील बदलामुळे संपूर्ण विदर्भावर सध्या धुक्याची चादर असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवेतील गारव्याने किटाणूजन्य आजारांचे सावट पसरले आहे. अशातच श्वासोच्छ‌वासाद्वारे स्वाइन फ्लूच्या विषाणूची बाधा होऊन एका वृद्धाचा मृत्यू झाला. सोबतच आणखी दोघांना या आजाराने विळखा घातला आहे. त्यामुळे विदर्भात  या आजाराने दगावलेल्यांची संख्या आता २० वर पोहचली आहे. 
मधूकर टिपले (वय ६४, रा. साईनगरी, वणी, जि. यवतमाळ) हे स्वाइनची लागण झाल्याने दगावलेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे. त्यांना ताप, अंगदुखी, ओकारीसह इतर त्रासामुळे सुरवातीला यवतमाळच्या खासगी रुग्णालयात व नंतर प्रकृती खालवल्यामुळे नागपूरच्या आदित्य रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच्या घशातील द्रव्याचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याच्या अहवालात त्याला स्वाइन फ्ल्यू असल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. दरम्यान आजपर्यंत नागपूर विभागात या आजाराच्या रुग्णांचीही संख्या आता थेट १२५ वर पोहचली आहे.   Print


News - Nagpur | Posted : 2018-12-20


Related Photos