महत्वाच्या बातम्या

 एचआयव्ही विभाग व सिकलसेल विभागातर्फे प्रथमच विवाहपुर्व एचआयव्ही व सिकलसेल तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : एचआयव्ही/ एड्स विषयी आपल्या समाजात अजुनही अनेक समज/गैरसमज व भय आहे. त्यामुळे तपासणी करीता लोक घाबरतात, परंतु आपल्या गडचिरोलीमध्ये सामुहिक विवाहासाठी आलेल्या वर वधुनी यावर मात केली आहे. आपल्या आरोग्याच्या व कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी विवाहपुर्व एचआयव्ही तपासणी व सिकेलसेल आजाराची तपासणी करुन घेतली आणि गडचिरोली जिल्ह्याकरीता नविन विक्रम केला.

२५ मार्च २०२३ रोजी शनिवारी मैत्री परिवार संस्था, नागपूर व पोलीस दल गडचिरोली यांच्यामार्फत आयोजित सामुहिक विवाह सोहळयात लग्नबंधनासाठी आलेल्या जोडप्याची जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील एचआयव्ही विभाग व सिकेलसेल विभागातर्फे १२७ जोडप्याची विवाहपुर्व तपासणी करण्यात आली. यात तीन जोडप्याची सिकेलसेल चाचणी सकारात्मक आली. 

याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. अनिल रुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महेश भांडेकर, सिकेलसेल समन्वय, रचना फुलझेले, समुपदेशक सविता वैद्य, प्रयोगशाळा तंत्रज्ञ निलिमा बालपांडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ धिरज इंगळे, समुपदेशक निता बालपांडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वप्नील चापले, समुपदेशक श्रीकांत मोडक तसेच संपुर्ण कार्यक्रमाकरीता डॉ. अमित साळवे यांनी मोलाचे सहकार्य केले. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos