आरमोरीत काँग्रेसच्या रस्ता रोको आंदोलनाने प्रशासन हादरले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  आरमोरी : 
म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळांच्या  शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्रावर १५ दिवसापासुन खाली बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी थाबली.  पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  खरेदी केलेल्या धानाचे चुकारे सुध्दा देण्यात आलेले नाही.  वारवार आदिवासी विकास महामंडळास  खाली बारदाना पुरवठा करण्याकरीता सुचना करुणही लक्ष दिले जात नसल्याने आज   १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता आरमोरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
  महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव गेडाम याच्या नेतृत्वात काँग्रेसच्या  वतीने  रस्ता रोको आदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे  काही वेळ वाहतुक ठप होती.  यामुळे  प्रशासनात खळबळ माजुन आ.वि.महामडळ नाशिक चे व्यवस्थापकीय संचालक गिरीष सरोदे,  प्रादेशिक व्यवस्थापक गांगुर्डे,  यांनी    आंदोलनाची तिव्रता लक्षात घेत  ४ हजार खाली बारदाना केद्रावर पुरवठा केलेला आहे.  तिन - चार दिवसात  धान खरेदी केंद्रांवर खाली बारदाना पोहचवु असे आश्वासन दिले.  तसेच माकेर्टिंग फेडरेशन च्या वतीने  आरमोरी येथील खरेदी  विक्री सस्थेच्या वतीने आधारभूत धान खरेदी सुरु करण्यात आली.  परतु गोडावुन नसल्याने अनेक दिवसा पासुन खरेदी बंद होती.  या दोन्ही मागण्यासाठी  रस्ता रोको आदोलन  करण्यात आले. खाली बारदाना व आरमोरी येथील खरेदी केद्र सुरु  करण्याचे आश्वासन दिल्याने काही दिवस आदोंलन स्थगित करण्यात आले.  परतु मागण्या माण्य न झाल्यास तिव्र आदोलन करण्यात येईल असा  ईशाराही  दिला आहे.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर वनमाळी, युवा नेते डॉ.नितीन कोडवते, जि.प. चे माजी.सभापती आनंदराव आकरे, प.स. चे माजी उपसभापती चदु वडपलीवार, मदन  मेत्राम , प.स.सदस्य वृदांताई गजभिये, देसाईगंज महीला काँग्रेस तालुका अध्यक्ष आरती लहरी, प.स.सदस्य विनोद बावनकर, प.स.सदस्य किरण मस्के, यादोराव पा.गायकवाड, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मिलीद खोब्रागडे,  गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम,  विधानसभा युवक काँग्रेस सचिव राहुल , देसाईगंज युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिकुं बावणे आदी उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-19


Related Photos