महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून येल्ला येथील टेकुल कुटुंबाची सांत्वन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील येल्ला येथील आदिवासी विध्यार्थी संघा व अजय मित्र परिवाराचे कट्टर कार्यकर्ते लिंगय्या टेकुल यांची आई ताराबाई टेकुल यांची दुःखद निधन झाल्याची वार्ता मिळताच आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अहेरी अजय कंकडालवार यांनी येल्ला येथे जाऊन टेकुल कुटुंबाची सांत्वन केले.

यावेळी येल्ला येथील टेकुल कुटुंबाची नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, राजू दुर्गे ग्रा.प. सदस्य महागाव, मल्लाजी पानेम, साईनाथ पानेम, रामदास टेकुल, नरेंद्र गर्गम, गणपत टेकुल,  रमेश टेकुल, विनोद रामटेके, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेकसह आविसंचे कार्यकर्ते व अजय मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos