गडचिरोलीत आरोग्य धनवर्षा डेव्हलपर्स अँड अलाईड लिमिटेड कडून ग्राहकांची फसवणूक


- गुंतवणूकदारांनी गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरात कार्यालय उघडून मोठ्या रक्कमेचे आमिष दाखविल्यानंतर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली मोठी रक्कम घेवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोग्य धनवर्षा डेव्हलपर्स अँड अलाईड लिमिटेड कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी पुराव्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कंपनीने ए डी व्ही क्रेडीट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या नावे चंद्रपूर मार्गावरील बट्टूवार काॅम्प्लेक्समध्ये कार्यालय उघडले. आर.डी., फिक्स डिपाॅझीट अशा प्रकारच्या योजना राबवून कमी कालावधील जास्त रक्कमेचे आमिष दाखवून मोठी रक्कम गोळा केली. ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण न करता तसेच ठेवीदारांच्या ठेवीमधून ठेवीदारांचा फायदा होईल, असे कोणत्याही योजनेची व्यवस्था केली नाही. सदर योजना राबविण्यास तसेच गुंतवणूकदारांकडून ठेवी स्वीकारण्यास सेक्युरीटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने मनाई केली असताना कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांकडून  मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारली आणि संगनमताने कट रचून गडचिरोली येथील कार्यालय बंद करून फसवणूक केली. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात कलम ४२० , ४०६ , ३४ भादंवी सहकलम ३, ४  महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध अधिनियम १९९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रदिप व्ही. चौगावकर यांच्या मार्फत सुरू आहे. गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतविलेल्या रक्कमेबाबत बाॅंड, शेवटचा हप्त भरल्याची पावती, बॅंक पासबुक प्रत, आधार कार्ड आदी दस्तऐवजांच्या छायांकीत प्रतीबाबत एजंटच्या माध्यमाने किंवा स्वतः स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय पोलिस अधिक्षक कार्यालय गडचिरोली येथे उपस्थित राहून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-19


Related Photos