महत्वाच्या बातम्या

 विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील खळबळजनक घटना : लॉकर तोडून रोख रक्कम व सोन्यासह २१ लाखांचा मुद्देमाल लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी लॉकर तोडून रोख रक्कम व सोन्यासह एकवीस लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. यात ८ लाख ४० हजार रोख आणि १३ लाख रुपयांचे सोने चोरीला गेल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वी याच बँकेचा अस्थायी कर्मचारी नंदकिशोर हनवते याने खातेदारांची फसगत करून ५७ लाखांची अफरातफर केली होती.
मंगळवारी सकाळी बँक व्यवस्थापक सधम्म फुलझेले हे बँक उघडण्याकरिता गेले, त्यावेळी बँकेची मागील खिडकी तुटली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरी झाल्याचा संशय येताच त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, पोलीस उपविभागीय अधिकारी नोपानी, ठाणेदार गोपाल भारती व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर तोडल्यानंतर लॉकर रूममध्ये प्रवेश करून गॅसकटरच्या साहाय्याने तिजोरीतील ८ लाख ४० हजार रोख आणि १३ लाख रुपयांचे सोने चोरी गेल्याचे समोर आले. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे तोंडावर रुमाल बांधून कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत. 






  Print






News - Chandrapur




Related Photos