महत्वाच्या बातम्या

 लोकहित संघर्ष समिती, आरमोरीच्या दीर्घ संघर्षाला यश वैनगंगा नदीच्या पुलावरील कठड्याचे काम सुरू


- वैनगंगा नदीच्या पुलावरील कठड्यांसाठी तबल २ वर्ष संघर्ष करावे लागले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : वैनगंगा नदीला २०२० मध्ये आलेल्या महापुरामुळे वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे वाहून गेले होते. त्यामुळे अपघात होऊन कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता होती ही बाब युवारंग तर्फे जानेवारी २०२१ ला माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आली होती सदर गंभीर समस्या लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे लावण्याचे सुचित केले. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे सदर सुचनांना केराची टोपली दाखविण्यात आली होती व तबल २ वर्ष लोटूनही सदर कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे लोकहित संघर्ष समिती आरमोरी तर्फे २ फेब्रुवारी २०२२ ला वैनगंगा नदीच्या तीरावर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले मात्र  या धरणे आंदोलनाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी फिरकले सुद्धा नाही. त्यामुळे लोकहित संघर्ष समिती आरमोरी तर्फे ४ फेब्रुवारी २०२२ ला वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून जलआंदोलन करण्यात आले होते या जलआंदोलनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी आंदोलनाला भेट दिली.  मात्र उडवा उडवीची उत्तर दिल्याने लोकहित संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची समाधान झाले नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्यात आले व ८ फेब्रुवारी २०२२ ला लोकहित संघर्ष समिती आरमोरी तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आरमोरी व चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी , शेतकरी , मजुरांचा जनसागर उसळला तेव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात लवकरच काम सुरू करणार असे लिहून दिले. मात्र काम सुरू करण्यात आले नाही पण लोकहित संघर्ष समिती आरमोरी तर्फे सातत्याने ६ महिने पासुन नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाला भेट देऊन व  चौकशी करत पत्रव्यवहार करून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे लावण्यासाठी बाध्य करण्यात आले तेव्हा दीर्घ संघर्षानंतर आज ३० सप्टेंबर २०२२ ला वैनगंगा नदीच्या पुलावरील कठड्याचे कार्य भूमिपूजन व जलपूजन करून सुरू करण्यात आले याप्रसंगी लोकहित संघर्ष समिती आरमोरी देवानंद दुमाने, रणजीत बनकर, अमोल मारकवार, निखिल धार्मिक, राहुल जुआरे, प्रफुल खापरे, संजय वाकडे, रिंकू झरकर , विभा बोबाटे, नेपचंद्र पेलणे, मनोज गेडाम , अजय कुथे, उमेश पिंपळकर, विनोद निमजे, दीपक सोनकुसरे , दीपक गोंधोळे , महेंद्र शेंडे , राकेश सोनकुसरे ,अभिषेक जुआरे, महेश पेलणे , आशुतोष गिरडकर, दिलीप हाडगे, प्रथमेश साळवे , सुरज ठाकरे , श्रीराम ठाकरे, अंकुश दुमाने, सचिन लांजेवार, भूपेश बेहेरे ,मुस्ताक शेख , शेषराज सोनकुसरे , निखिल बन्सोड, ज्योती बघमारे,  किशोर जंजालकर, उमा कोडापे , अंकुश गाढवे , सारंग जांभूळे, महानंदा शेंडे, आशा बोळणे व सर्व लोकहित संघर्ष समिती आरमोरीचे पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos