महत्वाच्या बातम्या

 पोलीस विभाग व मैत्री परिवाराचा हा सामूहिक विवाहाचा सोहळा अभूतपूर्व : आमदार डॉ. देवराव  होळी


- पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली व मैत्री परिवार संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजातील युवक-युवतींचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली व मैत्री परिवार संस्था नागपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या आणि आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला हा सामूहिक विवाह सोहळा अभूतपूर्व असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी या सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित नवदांपत्यांना आशीर्वाद देताना केले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आ. कृष्णा गजबे, पोलिस विभागाचे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. संदीप पाटील, आयुक्त राजकमल, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंढके, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुज तारे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा व मैत्री संस्थेचे पदाधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे आदिवासी समाजातील युवक-युवतींचा हा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सामूहिक विवाह सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील १२७ आदिवासी समाजातील युवक युवतींचा व ८ आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दाम्पत्याचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी खासदार अशोक नेते, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी सामूहिक विवाह प्रसंगी उपस्थिती दर्शवून नव दाम्पत्याना शुभ आशीर्वाद व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos