महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही येथील व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला


- आरोपीवर गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : प्रकाश समर्थ रा. सिंदेवाही येथील व्यापारी असून त्यांचे समर्थ मशिनरीज अँड इलेक्ट्रॉनिक हि दुकान आहे. प्रकाश वासुदेव समर्थ हे आपले नेहमी प्रमाणे दुकान बंद करून दुचाकीने घरी जात असताना स्टेट बँकेच्या मागे कॉलनीच्या भागात रस्त्यावर एक अनोळखी इसम संशयास्पद उभा त्यांना दिसला त्या व्यक्तिने प्रकाश समर्थ यांना विचारणा केली असता नागदेवते यांच्याकडे काम आहे असे सांगितले.

त्या नंतर प्रकाश समर्थ यांनी दुचाकीने समोर काही अंतर गेल्यानंतर त्या व्यक्तीने शिट्टी वाजविली. शिट्टी वाजवताच रस्त्याच्या एका बाजूला झाडाला लोखंडी तारे बांधून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तार घेऊन दुसरा अनोळखी व्यक्ती अंधारात बसून होता. शिट्टीचा आवाज जाताच त्याने तार जोराने ताणून धरला.

प्रकाश समर्थ यांच्या गळ्याला फास लागावा, हा आरोपींचा हेतू होता. मात्र समर्थ हे खाली वाकले व वाकूनच दुचाकी गाडीला काढण्याचा प्रयत्न केला. परंतु थोडासा उजव्या गालावर तार घासल्याने ते जखमी झाले. हि घटना शनिवारी रात्री अंदाजे ९ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर आरोपी पळून गेले. हा हल्ला नेमका कशासाठी झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिंदेवाही पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादंवि कलम ३४,३९४ गुन्हा दाखल केला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos