कमलापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माजी आमदार आत्राम , जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
१३ डिसेंबर  आणि  १६ डिसेंबरच्या सायंकाळ पासून ते १७ डिसेंबर च्या  मध्यरात्री पर्यंत आलेल्या अवकाळी पावसामुळे अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या  पिकांचे  मोठया प्रमाणात नुकसान झाले. या बाबीची दखल घेत माजी आमदार दीपक आत्राम , जि.प.उपाध्यक्ष  अजय कंकडालवार यांनी भेट देऊन पाहणी केली. 
 धनाचे  पुंजने , मुंग,ज्वारी व इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान   झाले  आहे.   पिके पावसात भिजून पिकांना कोम निघाले  आहे.  तसेच या पावसामुळे व  थंडीमुळे परिसरातील कमलापूर ताटीगुडम , कोडसेलगुडम,  मोददुडगुम , छल्लेवाडा आदींसह परिसरातील गावातील गाय, बैल, म्हशी,बकरे असे जनावरे मृत्युमुखी पडले. यामुळे शेतकऱ्यांच्या  शेतीच्या  नुकसानीसह जनावरे दगावल्याने मोठे संकट कोसळले.
  कमलापूर येथे नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी आमदार दिपक  आत्राम, जि.प.उपाध्यक्ष  अजय कंकडालवार यांच्यासह जि.प.सदस्य  अजय नैताम, जि प.सदस्या सुनीता कुसनाके, अहेरी पंचायत समितीच्या  सभापती सुरेखा आलाम, कमलापूरच्या  सरपंचा  रजनीता मडावी, सामाजिक कार्यकर्ता  संतोष ताटीकोंडावार, ग्रा.प.सदस्य  महेश मडावी, माजी सरपंच  सुंदरशाही मडावी, प्रतिष्ठित नागरिक  बक़ाया चौधरी, जीवन बंडावर, लक्ष्मण परकी, चंदु आत्राम व गावातील ५०० नागरिक उपस्थित होते.   पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-19


Related Photos