पोलिसाची हत्या करणारा आरोपी अटकेत, हत्येची दिली कबुली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  मारेगाव :
तालुक्यातील हिवरी येथे पोलिसांवर आपणच हल्ला केल्याची कबुली आरोपी अनिल मेश्रामने मारेगाव पोलिसांना दिली. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यादरम्यान मंगळवारी आरोपीची सदर घटनेबाबत चौकशी करण्यात आली.
घटनेच्या दिवशी पोलीस वारंट घेऊन रात्री माझ्या घरी आले. मला पोलीस ठाण्यात सोबत येण्यास आग्रह करीत होते. मी उद्याला येतो म्हणून सांगत होतो. पण पोलीस आताच चल म्हणत होते. म्हणून माझे डोके भडकले. मी पोलिसांना काठीने मारहाण करण्यात सुरुवात केली. तेव्हा एक पोलीस खाली पडला. त्याला मी हातातील काठीने झोडपले. दोन पोलीस पळून गेले.
खाली पडलेला पोलीस मृत झाल्याचे दिसताच मी पळून गेलो. जाताना मी आगपेटी  आणि मृत पोलीस शिपायाचा  मोबाईल सोबत घेऊन गेलो. जंगलात राहतांना खूप थंडी होती. माझ्याकडे पांघरूण नव्हते.  म्हणून यावेळी मी घरी आलो. अशी कबुली कोठडीतील आरोपीने पोलिसांना दिली. 
चौकशी दरम्यान पोलिसांनी मृतक राजेंद्र कुळमेथे यांचा मोबाईल आरोपीच्या भावाकडून जप्त केला. तसेच आरोपीने गावालगतच्या विहिरीजवळ लपवून ठेवलेले कपडे जप्त केले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-19


Related Photos