महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुर : राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ विधानसभा युवक काँग्रेसचा निषेध


- राहुल गांधींची खासदार की रद्द केल्याबद्दल. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपुर : मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात शिक्षा सुनावली युवक कांगेस तर्फे निषेध करण्यात आले. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

त्यानंतर आता राहुल गांधी यांचे खासदार पद म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने ही मोठी कारवाई केली आहे.

केरळच्या वायनाडमधील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनाव बद्दल टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांनी संपूर्ण मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. 

त्यांना उच्च न्यायालयात अपील करता यावे, यासाठी न्यायालयाने ३० दिवसांचा वेळ दिला असला तरी शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये केले होते वक्तव्य राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे ? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का असतात?. या विधानाबाबत सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ बल्लारपुर नगर परिषद चौकत निषेध प्रदर्शन करण्यात आले. 

यावेळी काँग्रेसचे नेते देवेंद्र आर्या, नाना बुंदेल, भास्कर माकोड़े, विनोद आत्राम, युवक प्रदेश सहसचिव चेतन गेडाम, जिल्हा  महासचिव शंकर महाकाली, युवक कांग्रेस अध्यक्ष जुनैद सिद्दिकी, अध्यक्ष, एनएसयूआय अध्यक्ष दानिश शेख, अरविंद वर्मा, अजय रेड्डी, जिशान सिद्दिकी, प्रांजल बालपांडे, संजु सद्दाला, दीपक झिल्ला, रोहित खान, अक्षय आरेकर, प्रफुल्ल मुडेवार, अकरम शेख, अनिल चौहान, राज वर्मा, सतपाल सिंह, सचिन कौरासे इ. उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos