दिव्यांग बालकांना मिळाली आकाशात उडण्याची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा
: दिव्यांग बालकांनी  ऐतिहासिक व  पर्यंटन स्थळाची माहिती  व महत्व जाणून घेऊन शाळेतील इतर विद्यार्थ्यांना   दयावी. हा क्षण आयुष्यभर आठवणीत राहुन प्रेरणा देईल अशा पध्दतीने  सहलीचा आनंद घ्यावा, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  विमानवारीने दिल्ली दर्शनासाठी निघालेल्या दिव्यांग  बालकांना दिल्यात. 
यावेळी जिल्हाधिकारी यांनी विमानवारीने दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या  बालकांच्या  गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. याप्रसंगी मुख्यकार्यंकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक  विकास संस्थेच्या  प्राचार्यं किरण धांदे ,  जेष्ट अधिव्याख्याता रेखा महाजन, समन्वयक प्रविण गौतम नयारा एनर्जी लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक  उपस्थित होते. 
ज्या वयात कागदाची विमाने उडवायची, आकाशातील विमानाकडे टक लावून पाहयचे त्याच बालवयात वर्धा जिल्हयातील जिल्हा परिषद तसेच खाजगी  शाळेतील  दिव्यांग चिमुकले चक्क विमानवारीने दिल्ली  दर्शनासाठी आणि राष्ट्रपती भवनास भेट देण्यास निघाले. दिव्यांग बालकांना अंपगत्वामुळे दिव्यांग बालकांना अपंगत्वामुळे  असलेले नैराश्य दूर करुन त्यांना जगण्याची नवी उमेद देण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीने   उडान प्रकल्पाअंतर्गत विमानवारीने दिल्ली पाहण्याचे  स्वप्न्‍ वास्तवात उतरले आहे. 
महात्मा गांधी यांची १५० वी जयंतीच्या निमित्ताने बालकांमध्ये शालेय अवस्थेपासुन मुल्यसंस्कार रुजविसाठी उडान प्रकल्प जिल्हयात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची प्रेरणा व संकल्पनेतून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक  विकास संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, यांच्या सहकार्यातून नयारा एनर्जी  लिमिटेड कंपनी मुबंई यांच्या सौजन्याने गेल्या वर्षीपासुन  सार्थक जीवनासाठी मुल्यशिक्षण हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम , उपक्रम, व स्पर्धा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व अभिव्यक्तींला चालना दिली जात आहे. मुलांचा उत्सफुर्त प्रतिसाद व शिक्षकांचे उत्तम मागदर्शन यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. 
दिव्यांग बालकांची शाळा, केंद्र, तालुका असे टप्पे पार करुन १२ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय उडाण ही सामान्यज्ञान परीक्षा नई तालीम सेवाग्राम येथे पार पडली . या सामान्य ज्ञान परीक्षेत जिल्हयातील इयत्ता ५ ते ८ पर्यंतचे ४५० विद्यार्थी  सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांची लेखी व तोंडी परीक्षा त्यांच्या अध्ययन क्षमतेनुसार घेण्यात आली. या परिक्षेत  सहभागी विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी गुणवत्तेत चमकले. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यात आपली चुणुक दाखविली. जिल्हाधिकारी यांनी जाहिर केल्या प्रमाणे स्पर्धेत गुणवत्तेत चमकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विमान वारीने दिल्ली दर्शन व राष्ट्रपती भवनास भेट देण्याची संधी प्राप्त झाली आहे. आज  १८ डिसेंबर रोजी विमानात बसण्याचे या बालकांचे स्वप्न  पूर्णत्वास आले. १८ ते २१ डिसेंबर  या कालावधित दिल्ली येथे गांधीजीचे वास्तव्य  असलेली ठिकाणे, त्यांनी उभ्या केलेल्या  संस्थांना भेट देऊन  तेथुन गांधी विचारांची प्रेरणा घेतील तसेच या वारीत ते राष्ट्रपती भवनास भेट देतील.   जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिका-यांसह अनेक मान्यवरांनी हया चिमुकल्यांच्या दिल्ली वारीला शुभेच्छा दिलेल्या आहेत.

   Print


News - Wardha | Posted : 2018-12-18


Related Photos