महत्वाच्या बातम्या

 विदर्भ रत्न पुरस्काराने माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे व आदिवासी सेवक प्रमोद पिपरे सन्मानित


- बीसीएन न्युज व नागपूर मेट्रो समाचारचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/ गडचिरोली : बीसीएन न्यूज व नागपूर मेट्रो समाचारच्या वतीने 24 मार्च रोजी नागपूर येथील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये आयोजित विदर्भ रत्न अवार्ड कार्यक्रमात सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. योगिता पिपरे व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिवासी सेवक प्रमोद पिपरे यांना विदर्भ रत्न पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सेंटर पॉइंट हॉटेल रामदासपेठ नागपूर येथे काल 24 मार्च रोजी आयोजित विदर्भ रत्न अवार्ड कार्यक्रमाला प्रामुख्याने लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा, लोकसभेचे खासदार कृपाल तुमाने, मिस युनिव्हर्सची थर्ड रनर अप जोया सिराज शेख, फाउंडर इन डायरेक्टर इंडिया आय एन सी डायरेक्टर डॉन बॉस्को हायस्कूल मोहिनी शर्मा टीव्ही अँक्टर समीर खान, जुरी सदस्य डॉक्टर दिपेन अग्रवाल, मोहम्मद इजराइल सेठ, प्यारे खान, प्रदीप मोहिते, शिवकुमार यादव, धर्मा रामानी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, बीसीएन ग्रुपचे फाउंडर सिराज शेख, डायरेक्टर फैजाण शेख, ग्रुप डायरेक्टर इमरान शेख उपस्थित होते.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यात अग्रेसर राहून महिला व नागरिकांचे प्रश्न अडचणी दूर करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या व नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असतांना नागरिकांसाठी वीज, पाणी रस्ते, नाल्याची व्यवस्था, ओपन स्पेस चे सोंदर्यीकरण करून शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या तसेच कोविड 19 च्या काळात गरीब, रिक्षा चालक व कामगार वर्गाला जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण, अन्नधान्याचे वाटप, रुग्णालयातील कोविड बाधीत रुग्णांच्या नातेवाईकासाठी भोजन दान.

तसेच गरिबांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. योगीता प्रमोद पिपरे तथा सामाजिक कार्य करणारे, आदिवासी सेवक म्हणून समाजासाठी सतत उल्लेखनीय कार्य करणारे व ओबीसी आरक्षणासाठी सतत प्रयत्नशील ओबीसीचे नेते, आदिवासी सेवक प्रमोद पिपरे यांचा सपत्नीक लोकसभेचे खासदार कृपाल तुमाने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विदर्भ रत्न पुरस्कार, चषक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात विदर्भातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 55 नामवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos