महत्वाच्या बातम्या

 २६ मार्चला चंद्रपूर जिल्हा चालक पोलीस शिपाई लेखी परिक्षा होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा चालक पोलीस शिपाई २०२१ साठी घेण्यात आलेल्या शारिरीक चाचणी तसेच कौशल्य चाचणी मध्ये विहीत गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व लेखी परिक्षा करीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा २६ मार्च २०२३ रोजी सकाळी ०८:३० वाजता मातोश्री विद्यालय, चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.

लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. तसेच त्यांनी आवेदन अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्यात येत आहे. लेखी परिक्षेसाठी उमेदवारांनी परिक्षा केंद्र (मातोश्री विद्यालय, ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर) येथे ०२ (दोन) तास अगोदर म्हणजे २६ मार्च २०२३ रोजी सकाळी ०६:३० वाजेपर्यंत पोहचणे आवश्यक आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos