महत्वाच्या बातम्या

 राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा तर्फे अहेरी येथे उद्या तीव्र निदर्शने


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चोर है असे सार्वजनिक सभेत मनुन समस्त OBC समाजाची तथा देशाच्या प्रधानमंत्री यांची बदनामी केले होते, त्यावर सुरत जिल्हा न्यायालयाने शिक्कामोर्तब करीत राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा नुकतीच सुनावली आहे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांची खासदारकी ही आज रद्द केली आहे. 

बहुसंख्य ओबीसी समाजाची बदनामी करून त्यांची भावना दुखावनाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी ह्यांचा भाजपा अहेरी तालुका तर्फे अहेरी येतील मुख्य चौकात उद्या दुपारी 12 वा. तीव्र निदर्शने करून जाहीर निषेध केले जाणार आहे, ह्यात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांनी केले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos