महत्वाच्या बातम्या

 सामाजिक वनीकरण अंतर्गत वर्ष निहाय रोप वनांची माहिती संकेत स्थळावर उपलब्ध : वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : वृक्ष लागवडी संदर्भात सर्व माहिती राज्य शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत दिली. मराठवाड्यातील वृक्ष लागवड योजनेची चौकशी करण्याबाबत विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात ३३ कोटी  वृक्ष लागवड योजने अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली होती. सन २०१९ मध्ये १ कोटी ७६ हजार ६९ हजार १५० वृक्ष लागवड केली असून यापैकी ७६ टक्के वृक्ष जीवंत आहेत. सन २०२० मध्ये कोविड काळात लागवड केली नाही. सन २०२१  मध्ये  १६ लाख ५१ हजार ४१ इतकी वृक्ष लागवड केली असून त्यापैकी ७५ टक्के वृक्ष जीवंत आहेत. 


सन २०२२ मध्ये १९ लक्ष ६ हजार १५६ वृक्ष लावलेले आहेत त्यापैकी ९४ टक्के रोपे जीवंत आहेत. वर्षनिहाय लावलेल्या वृक्षांची माहिती https://mahaforest.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत सहभागी व्हावे यासाठी मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित केल्या होत्या. वनामध्ये लागणा-या वणव्यांच्या उपाययोजनांसाठी १९६२ या  टोल फ्री क्रमांकावर तक्रार देखील करता येवू शकते. तसेच जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये वणवा उपाययोजनासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे, असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य विक्रम काळे यांनी उप प्रश्न उपस्थित केले.





  Print






News - Rajy




Related Photos