महत्वाच्या बातम्या

 कायदेशीर विधी सेवा देण्याकरिता लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : कायदेशीर विधी सेवा देण्याकरिता लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच आभासी पद्धतीने पार पडले. विधी सेवा संरक्षण सल्लागार प्रणालीचे आभासी पध्दतीने उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय एस. ओक, न्यायमूर्ती आणि कार्यवाहक महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुबई, बॉम्बे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांचे शुभहस्ते लोक अभिरक्षक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तर्फे गरजुंना कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच न्यायालयापर्यंत कायदेशीर मदत दिली जाते, विधी सेवा सल्लागार अश्या गरजू व्यक्तींचे व विधी लाभार्थीचे प्रतिनिधित्व कनिष्ठ न्यायालये, उच्च न्यायालयासमोर करीत असतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांचे तर्फे गरजुंना कायदेशीर मदत देण्याकरिता विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 अन्यवे पॅनेल अधिव्यक्तांची नेमणूक करण्यात येत होती. यात विधी लाभार्थींना अधिक प्रभावी मदत मिळावी या करिता कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार प्रणाली 2022 या नवीन अमलात आलेल्या  कायद्यान्वये विधी गरजुंना व लाभार्थींना त्यांचे अटकेपुर्विपासुनच विधी सहाय मिळणे, तसेच जमानती अर्ज दाखल करणे, अपील करणे, सत्र न्यायालयातील व कनिष्ठ न्यायालयातील फौजदारी संपरिक्षा प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळणे, तसेच प्रकरणामध्ये प्रभावीरीत्या आरोपीचा बचाव न्यायालयापुढे मांडणे याकरिता विधीतज्ञाची  पॅनेल नेमणूक करण्यात आली असून त्यामध्ये लोक अभिरक्षक कार्यालय स्थापित करण्यात आले आहे.

त्यात जिल्हा मुख्य विधी सेवा संरक्षण अधिवक्ता म्हणून भारत भिमरावजी गभने, तसेच उपमुख्य विधी सेवा संरक्षण अधिवक्ता म्हणून इकबाल अहेमद अ. सिद्दिकी, तसेच सहायक विधी सेवा संरक्षण अधिवक्ता म्हणून स्मिता उदाराम मेश्राम, कमरून निशा शेख व राजेश देवदास राहुल यांची नेमणूक करण्यात  आलेली असून त्यांनी 13 मार्च 2023 पासून कार्यभार सांभाळलेला आहे. तरी गरजूंनी विधी सेवाकरिता नमूद कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos