महत्वाच्या बातम्या

 युवा संवादसाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थाकडून अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत युवा संवाद@2047 या कार्यक्रमाचे प्रत्येक जिल्ह्यात आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या पंचप्राण विषयावर कमीत कमी 500 किंवा जास्त सहभागींना तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून विस्तृत माहिती द्यावयाची आहे. या करीता सामाजिक क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थेकडून 29 मार्च पर्यत नेहरू युवा केंद्र येथे अर्ज मागविण्यात येत आहे. तरी अर्जाचा नमुना तथा अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र, भंडारा येथे  अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 8605417083 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, भंडारा यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos