चाईल्ड पॉर्न व्हिडिओ शेअर केल्यास व्हॉट्सऍप अकाऊंट बंद करण्याबरोबरच सात वर्षे कारागृहाची सजा


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली : व्हॉट्सऍप   वरून चाईल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवले आणि त्याविरोधात एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास व्हॉट्सऍप अकाऊंट बंद करण्याबरोबरच सात वर्षे कारागृहाची हवा खावी लागणार आहे. 
  चाईल्ड पोर्नोग्राफी ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. व्हॉट्सऍप  वरून अनेक जण एकमेकांना चाईल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा एक गुन्हा असून, या गुन्ह्याचा तपास करण्यात येईल. चाईल्ड पॉर्न व्हिडिओ पाठविणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्यात येतील. पोर्नोग्राफीसाठी व्हॉट्सऍप वर आजिबात जागा नाही. कुणी याविरोधात तक्रार केल्यास व्हिडिओ पाठवणाऱ्यांचे व्हॉट्सऍप   अकाउंट  बंद करण्यात येईल, अशी माहिती व्हॉट्सऍप  च्या एका प्रवक्त्याने दिली आहे.    Print


News - World | Posted : 2018-12-17


Related Photos