रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / कल्याण : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 35 वर्षीय रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. मागील सहा महिन्यांपासून नराधम आरोपी पीडित मुलीचे लैंगिक शोषण करत होता. हा धक्कादायक प्रकार पीडित मुलीच्या आई वडिलांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपी रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दीपक हिवाळे असे अटक केलेल्या 35 वर्षीय नराधम आरोपीचे नाव असून तो रिक्षाचालक आहे. आरोपी हिवाळे यांने काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवली होती. त्यानंतर आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आहे.
मागील सहा महिन्यांपासून आरोपी रिक्षाचालक पीडित मुलीचे लैंगिक शोषण करत होता. हा धक्कादायक प्रकार समजताच पीडित मुलीच्या आई वडिलांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
News - Rajy | Posted : 2022-03-05