महत्वाच्या बातम्या

 महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे तंत्रज्ञान जागृती वर सेमिनार संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बदलत्या काळात तंत्रज्ञानाचे ज्ञान सर्वांनाच असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मल्टी मीडियाच्या अतिवापराच्या काळात वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त होण्यासाठी तथा आपली फसवणूक होऊ नये याकरिता तंत्रज्ञानाचे अद्यावत ज्ञान असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत रेस कर्मवीर चक्र अवॉर्ड पुरस्कृत साई कृष्णा मोरा यांनी व्यक्त केले. ते महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित तंत्रज्ञान जागृती या विषयावरील सेमिनारमध्ये बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .संजय फुलझेले हे होते .तर प्रमुख अतिथी प्रा.बी.के.राठोड, प्रा. श्रीकांत मल्लेलवार , आर अंबिलपु, प्रा. शास्त्रकार, प्रा. खुणे, प्रा. पांडे ,प्रा. बोबाटे, प्रा. गजभिये, प्रा. कोरडे, डॉ. राजकुमार मुसने , प्रा. सालुरकर, प्रा. गभणे आदीं उपस्थित होते. पुढे बोलताना मोरा साई कृष्णा यांनी आयओटी व रोबोटिक्स या संदर्भातली माहिती विद्यार्थ्यांना  दिली. सोशल मीडियावर फोटो टाकताना घ्यावयाची दक्षता, गैरवापर याविषयी जाणीव करून दिली.

तद्वतच मोबाईलच्या माध्यमातून अनेक यंत्रांवर नियंत्रण कसे ठेवता येते चालू असलेली लाईट. अथवा फॅन मोबाईल वरून कसे बंद करता येऊ शकते, या अनुषंगाने रोबोट हा पार्ट कसा विकसित केला जाऊ शकतो , याविषयी मार्गदर्शन केले. जगाची डिजिटल क्रांतीकडे होत असलेली वाटचाल पाहता कृतीम बुद्धिमत्ता अथवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्व डिजिटल फॉरमॅट मध्ये सोदाहरण पटवून दिले.

स्मार्टफोन, ऑटोमोबाईल्स , मॅन्युफॅक्चरिंग , व्हिडिओ गेम सारख्या विविध क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या विविध संधी विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे संचलन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. राजकुमार मुसणे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सह कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योती बोबाटे हिने मानले.





  Print






News - Chandrapur




Related Photos