महत्वाच्या बातम्या

 पीएम किसान सन्मान संमेलन व रब्बी हंगाम पूर्व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : कृषि विज्ञान केंद्र, विभागीय धान संशोधन केंद्र, तसेच तालुका कृषि अधिकारी, सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ ऑक्टोबर २०२२ रोजी पी. एम. किसान सन्मान संमेलन व रब्बी हंगाम पूर्व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  डॉ. व्ही. जी. नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही हे होते. उद्घाटक म्हणून सौ. सोनाली पेंदाम सरपंच गडमौशी, प्रमुख उपस्थितीमध्ये ए. आर. महाले तालुका कृषि अधिकारी सिंदेवाही, हेमंत शेंदरे प्रगतीशील शेतकरी, मदन वांढरे धान पैदासकार आणि जी. बी. गणवीर वरिष्ठ संशोधन सहाय्यक कृषि संशोधन केंद्र सिंदेवाही तसेच के. व्ही. के सिंदेवाही शास्त्रज्ञ डॉ विजय सिडाम, डॉ. लोखंडे सोनाली, डॉ. वर्षा जगदाळे आणि कु. स्नेहा वेलादी व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी होते. यावेळी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने देशाला केलेली संबोधनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी मा. पंतप्रधान यांच्या हस्ते पीएम शेतकरी कल्याण निधीचा १२ हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. तसेच देशभरात एक राष्ट्र एक खत योजनेची सुरुवात करण्यात आली. तसेच देशभरात ६०० पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण मा. पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी केंद्रीय कृषी मंत्री मा. नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण आणि रसायन व खते मंत्री मा. डॉ. मनसुख मांडविया यांच्या भाषणाचेही थेट प्रक्षेपण करण्यात आले. तसेच यावेळी पीएम किसान सन्मान संमेलनच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये १ शेतकरी व २ महिला शेतकऱ्यांचा रब्बी पिकाचे बियाणे देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मार्गदर्शनातून डॉ. व्ही. जी. नागदेवते यांनी रब्बी हंगामातील प्रमुख पिकांच्या लागवड तंत्रज्ञान खताचा संतुलित वापर आणि पाण्याचे योग्य नियोजन  याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विजय सिडाम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविका मध्ये केंद्र सरकार मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध शेतकरी कल्याण योजनाबद्दल माहिती दिली यामध्ये निम कोटेड युरिया, किसान क्रेडिट कार्ड, शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, एक राष्ट्र एक खत योजना, पीएमएफएमई योजना, शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारणी इत्यादी विविध योजना त्यांनी शेतकरी बांधवांसाठी माहिती दिली. मदन वांढरे यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाना बद्दल मार्गदर्शन केले. ए. आर. महाले यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. डॉ. सोनाली लोखंडे यांनी भरडधान्याचे पोषण आहारातील महत्व विशयी, आशीष नागदेवे यांनी कृषि हवामान सल्ला बद्दल मार्गदर्शन केले. तसेच के. व्ही. के. व विभागीय धान संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार प्रदर्शन डॉ. लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सुशांत डंबोळे, कैलास कामडी व सर्व कृषि सहाय्यक यांनी सहकार्य केले





  Print






News - Chandrapur




Related Photos