अज्ञात महिला, पुरूषाने एटीएममधून पैसे काढताना कार्ड बदलून लुटले


- ३८ हजार ५०० रूपयांची फसवणूक करून पसार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सडक अर्जूनी :
देवरी येथे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून एटीएम कार्ड बदलून  घेवून ३८ हजार ५०० रूपयांची रक्कम काढून महिला व पुरूषाने पोबारा केला आहे. याप्रकरणी देवरी  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी देवानंद टेंभुर्णे हे बॅंक ऑफ इंडीया देवरी शाखेच्या एटीएममधून रक्कम काढण्यासाठी गेले होते. यावेळी एटीएममध्ये तांत्रिक बिघाड होता. यानंतर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे एटीएम गाठले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला व पुरूषाला त्यांनी एटीएम कार्ड देवून पैसे काढून देण्यास सांगितले. यावेळी त्यांनी तुमच्या खात्यात पैसे नाहीत, अशी माहिती देवून एटीएम बदलून घेतले. यानंतर त्यांनी ३८ हजार ५०० रूपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच टेंभुर्णे यांनी देवरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आरोपीने साखरीटोला येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएममधून पैसे काढून घेतले. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला असून पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.

   Print


News - Gondia | Posted : 2018-12-16


Related Photos