वडधा जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  आरमोरी
:  तालुक्यातील वडधा येथील जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना काल १५ डिसेंबर रोजी घडली. विद्यार्थ्यांना गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात भरती करण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
सुरज रामटेके, गौरव सयाम, अश्विन मेश्राम, वैष्णव गिरधारे, निराशा लाकडे, प्रतिभा मेश्राम, मोनाली कोलते, खुशी येवले, कुंदन ठाकूर, प्राची गंडाटे, प्रेम लाकडे, जान्हवी कुमरे, समिर मेश्राम, नयन सहारे, कुणाल निकुरे, लक्ष्मी सहारे, समीर कन्नाके, सानिया पोहणकार, रितू गेडाम अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील १५ विद्यार्थी चवथ्या वर्गाचे तर चार विद्यार्थी तिसऱ्या वर्गाचे आहेत.
३० डिसेंबरपासून क्रीडा संमेलन असल्याने सर्व विद्यार्थी कृषी उत्पन्न बाजार समिती लगत खेळण्यासाठी गेले होते. सकाळी ९.१५ वाजता सर्व विद्यार्थी शाळेत आले. १० वाजता त्यांना जेवन देण्यात आले. काही वेळातच काही विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास सुरू झाला. हळूहळू उटली व मळमळ वाटू लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. लगेच त्यांना वडधा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना गडचिरोली येथे हलविण्यात आले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-16


Related Photos