महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून इंदाराम येथील कोरेत परिवाराला आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे रात्री जोरदार वादळ-वारा सुटला होता. त्या वादळ वाऱ्यात संपत हनमंतु कोरेत यांच्या घरावरील टीनचे छत संपूर्ण उडाले असून संसार उघड्यावर आला होता. सदर बाब जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच घटनास्थळी भेट देवून तलाठीला बोलवून पंचनामा करण्यास सांगितले. मात्र प्रशासनाकडून आताचे आता नुकसान भरपाई मिळत नाही.

त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत केली. असून प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचे सांगत कुटुंबाला धिर दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, गुलाबराव सोयाम माजी सरपंच, प्रल्हाद पेंदाम, लखमा सड़मेक, पिंटू मडावी, प्रवीण कोरेत, शांताबाई कोरेत, दिलीप मडावी, विनायक सड़मेक, बाबीता आत्राम, रमेश कन्नाके उपस्थीत होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos