महत्वाच्या बातम्या

 वैद्यकीय शिक्षण सचिवांची बदली करा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीमुळे वाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना लिहिले आहे.

गडकरी यांनी त्यांच्या पत्रात डॉ. जोशी या सीपीएसच्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप केला आहे. या मागणीमुळे नवीन वाद होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांचा अचानक वैद्यकीय शिक्षणसंस्थेच्या कामकाजातील स्वारस्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, या पत्रामागे कामकाजातील अडथळा हे कारण नसून गडकरी यांच्या पत्नी कांचन या असल्याचे उघड झाले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संबंधीचे वृत्त दिले आहे.

डॉ. अश्विनी जोशी यांनी काही काळापूर्वीच कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (सीपीएस)च्या कामकाजातील तफावत उघडकीला आणली होती. मात्र, त्यानंतर गडकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना दोन पत्रे लिहून जोशी यांच्यामुळे सीपीएसच्या जवळपास १ हजार १०० जागांचे प्रवेश रखडत असल्याचा आरोप केला. गडकरींनी यापूर्वी लिहिलेल्या पत्रात देखील हा उल्लेख करण्यात आला होता.

परंतु, यामागील कारण वैद्यकीय प्रवेशांची रखडपट्टी हे नसून गडकरी यांच्या पत्नी कांचन असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. गडकरी यांच्या पत्नी कांचन या सीपीएसशी संलग्न संस्थांतील नवीन संघटनांच्या सल्लागार पदावर आहेत. तशी कागदपत्रंही आढळल्याचा उल्लेक केला आहे. या सगळ्यावर गडकरी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.





  Print






News - Rajy




Related Photos