गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मॅराथान ,रांगोळी व क्रिकेटच्या सामन्याने सीएम चषकाला सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सीएम चषकाच्या स्पर्धाना सुरुवात  झाली असून आज १५ डिसेंबरला  मॅराथान ,रांगोळी व क्रिकेटच्या उद्घाटनीय सामन्याने या स्पर्धेची अधिकृत सुरुवात झाली. सकाळी ८ वा इंदिरा गांधी चौकातून मॅरेथॉन स्पर्धेला  सुरुवात झाली .गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ.  देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिताताई भांडेकर व नगर परिषदेच्या अध्यक्षा   योगिताताई पिपरे यांनी हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेची  सुरुवात केली.  सकाळी ११ वा क्रीडा प्रबोधिनी गडचिरोली येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.  स्पर्धेनंतर  विजयी खेळाळूची निवड करून अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना  मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी प्रमाणपत्राचे वाटप आमदार डॉ देवरावजी होळी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीताताई भांडेकर,न परिषदेच्या अध्यक्षा   योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत  वाघरे, न प उपाध्यक्ष अनिल  कुनघाडकर, बांधकाम सभापती आंनदभाऊ शृंगारपवार,  युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष स्वप्नील  वरघंटे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते प्रमोद  पिपरे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश  गेडाम,ओबीसी जिल्हा महामंत्री मधूकर भांडेकर, अविनाश महाजन,   तालुकाध्यक्ष विलास  भांडेकर,महामंत्री बंडू  झाडे,कावनपुरे संजय बारापात्रे, मंगेश रणदिवे,कांता कुलसंगे,जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदें , जिल्हा संयोजक अनिल  तिडके  विधानसभा संयोजक गणेश नेते, श्रीकांत  पतरंगे निखिल चरडे, नगरसेवक ,भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-15


Related Photos