वडसा येथील ‘त्या’ राईस मिलची होणार तपासणी, पथकाची नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
क्षमता कमी असतांनाही कमी कालावधीत ३ लाख ५०  हजार क्विंटल धानाची भरडाई दिल्याच्या तक्रारीवरून वडसा येथील मे तिरूपती राईस मिल आणि तिरूपती राईस इंडस्ट्रीज या  राईस मिलची तपासणी केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी चार सदस्यांचे तपासणी पथक नियुक्त केले आहेत.
तपासणी पथकामध्ये नाशिक येथील मुख्य कार्यालयातील वरीष्ठ व्यवस्थापक सोपान संवारे, व्यवस्थापक मनोजकुमार शर्मा, व्यवस्थापक योगेश पाटील, उपव्यवस्थापक विजेंद्र गोसावी यांचा समावेश आहे. आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम २०१६ - १७ मध्ये गडचिरोली प्रादेशिक कार्यालया अंतर्गत मे तिरूपती राईस मिली आणि तिरूपती राईस इंडस्ट्रीज या मिलला भरडाईचे काम देण्यात आले होते. या मिलची भरडाईची क्षमता कमी असतानाही त्यांनी कमीत कमी कालावधीमध्ये ३ लाख ५० हजार क्विंटल धानाची भरडाई केल्याची तक्रार करण्यात आली होती. यामुळे या राईस मिलची तपाणी करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहे. तपासणी अहवाल २५ दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-15


Related Photos