महत्वाच्या बातम्या

 डाकघर आपल्या दारी योजनांचा लाभ घ्यायचायं : तर जा डाकविभागात


- नारगुंडा पोलीस मदत केंद्रात दोन दिवशीय मेळावा : नागरीकांची गर्दी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : नारगुंडा पोलीस मदत केंद्र अतिशय घणदाट जंगलात आणी गडचिरोलीच्या टोकावर बसलेले आदीवासी बहुल माडीया गोंड समाजाचे अशीक्षीत असलेल्या नागरिकाच्या परीसरात आहे. या पोलीस मदत केंद्रात पोलीस दादालोरा खीडकीच्या माध्यमातून पोलीस दल व भारतीय डाकविभाग यांच्या संयुक्तविद्यमाने १४ व १५  ऑक्टोबर रोजी डाकघर योजना आपल्या द्वारी मेळावा घेण्यात आला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधीकारी मयुर पवार होते. प्रमुख अतीथी म्हणून डाकविभागाचे प्रमुख अनमोल चवरे उपस्थीत होते. मेळाव्यात प्रस्तावीकेतून प्रभारी अधीकारी मयुर पवार यांनी पोलीस दल, पोलीस दादालोरा खीडकी अंतर्गत जणकल्याणाकरीता राबवीण्यात येणाऱ्या विवीध  कल्याणकारी योजनांची माहिती देत नागरीकांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान केले. तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले डाकविभागाचे प्रमुख अनमोल चवरे यांनी डाक विभाग हा पत्र व्यवहारापर्यंतच मर्यादीत राहीलेला नसुन डाक विभागाला बँकेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच डाक विभागाचे सुकण्या  समृध्दी खाते म्हणजे मुलीच्या लग्नाचे आणी शीक्षणाच्या खर्चाची चिंता दूर. ग्रामीण डाक जीवणविमा  कमी हफ्ता जास्त बोनस, RD, KVP, TD, PPF, PMJJBY, PMSBY, MIS, NSC, SCSS, SB म्हणजे बचत खाता चालु केल्याबरोबर SCSS इंटरनेट बँकींग, चेकबुक, NEFT, RTGS ची सुवीधा तसेच IPPB भारताची डीजीटल बँक याद्वारे शासकीय अनुदान सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा  होण्यासाठी लागणारे IPPB DBT खाते, प्रीमीयम खाते, मोफत ० ते ५ वयोगटातील बालकांचे बाल आधार, आधार मोबाईल जोडणीकरण, वार्षीक ३९९ रु फक्त मध्ये १० लाखाचा अपघात वीमा कुठलीही फी वसुल न करता कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमधून पैसे नीकासी यासाठी खाजगी केंद्रातून कसे १००० रु वर २० रु अधीक पैसे घेउन ग्राहकांची लूट केल्या जाते यासंबंधी जनजागृती केली. तसेच सेवा सेतू केंद्र (CSC) आता डाकविगामध्ये सुरु झालेला आहे. त्याद्वारे ड्रायवींग लायसंस, १०९ रु मध्ये मात्र २४ तासात पॅनकार्ड, १५ रु मध्ये डीजीटल सातबारा, मोफत श्रम कार्ड, इलेक्शन कार्ड, आयूष्यमान भारत कार्ड, हेल्थ कार्ड, १५ रु मध्ये पीएम किसान ईकेवायसी तसेच नवीन लाभार्थी अर्ज नोंदणी, शेतकरी DBT अंतर्गत अनुदानीत तत्वावर शेती उपयोगी साधने योजना अर्ज दाखल करणे ई. सगळ्या सेवा शासकीय फी मध्ये डाक वीभागात उपलब्ध आहेत त्याचा नागरीकांनी लाभ घेउन खाजगी CSC केंद्राद्वारे होणारी स्वताची लूट थांबवावी असे आव्हान केले.

भामरागड तालूक्यात १२२ गावे असून फक्त दोनच बँका आहेत. परंतु ५१ डाकवीभागाचे शाखा आहेत यांचा नीश्चीतच नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात  आले. या योजना मेळाव्‍याला यशस्वी करण्यासाठी पोलीस मदत केंद्राचे अंमलदार तसेच डाकविभागाचे BPM रोशन अलचेट्टीवार, अरुण वावधने, श्रीनीवास बंडमवार, भूमिका भोळे, दीक्षा गाभणे, कौस्तुभ कसारे, रोहीत सींग, सोहेल खान यांनी यशस्वीरीत्या कार्य पार पाडले.


या योजनांचा लाभ दिला.

- सुकन्या समृध्दी खाते (५७)

(४० खात्यांचे पैसे पोलीस स्टेशन नारगुंडा यांच्याकडून देण्यात आले)

- बाल आधार (३१)

- आधार मोबाईल लिंक (७६)

- IPPB DBT खाते (४१)

- GI (०६)

- RD खाते (२३)

- ग्रामीण डाक जीवन वीमा (०८)

- पॅन कार्ड (४३)

- Learning license (१८)

- ईश्रम कार्ड (११)

- डीजीटल सातबारा (२१) 

- PM KISAN (१२)

- ईलेक्शन कार्ड (३१)

एकूण ३६७ योजनांचे यशस्वी व्यवहार करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos