महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी च्या बोधी रामटेके ला मिळणार ४५ लाखांची शिष्यवृत्ती


- इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन येथे उच्चशिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी येथील बोधी रामटेके याला इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन येथे उच्चशिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. जगातील १५ स्काॅलर्समध्ये निवड.

परदेशात उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण व संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फ़त देण्यात येणाऱ्या इरासमूस मुंडस या ४५ लाखांच्या जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. जगभरातून १५ स्कॉलर्सची निवड यात करण्यात आली. यात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी सारख्या भागातून पुढे आलेल्या बोधीची निवड खूप आनंददायी आहे. इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन येथे पुढील दोन वर्ष जगातील विविध चार नामांकित विद्यापीठाच्या संयुक्त अभ्यासक्रमात बोधी उच्चशिक्षण घेणार आहे. बोधीची सामाजिक वकिली, प्रत्यक्ष जमीनीपातळीवरचे काम अत्यंत प्रेरणादायी आहे. खरेतर त्याच्या या कामाचाच सन्मान आहे.

आंबेडकरवादी चळवळीतील विद्यार्थ्यांचे नव्या संधी शोधणाऱ्या आत्मविश्वासाचा नवा पाठ आहे. या आत्मविश्वासापर्यत पोहचावे, आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी, हे प्रेरणादायी आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos