महत्वाच्या बातम्या

 डाक विभागाच्यावतीने अदालतचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारतीय डाक विभागाच्यावतीने 27 मार्चला सकाळी 11.30 वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना डाक सेवेबाबत तक्रारी सादर करावयाच्या असल्यास 24 मार्च पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे. 

पोष्टाच्या कामासंबंधीच्या तक्रारीचे सहा आठवड्याच्या आत निराकरण झालेले नाही व समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यास अशा तक्रारीची दखल डाक अदालतमध्ये घेतल्या जाणार आहे. तक्रारीमध्ये टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक, मनी ऑर्डर या सेवांचा समावेश असणार आहे. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार अधीक्षक डाकघर,  वर्धा विभाग यांच्या नावाने 24 मार्च पुर्वी पोहोचेल या बेताने पाठवावी. तक्रारकर्त्याला डाक अदालतसाठी स्वर्चाने उपस्थित राहावे लागेल, असे  डाक विभागाने कळविले आहे. 





  Print






News - Wardha




Related Photos