नेपाळमध्ये १०० पेक्षा जास्त रूपयांच्या भारतीय नोटांवर बंदी


- २०० , ५०० आणि दोन हजारांच्या नोटा चालणार नाहीत
वृत्तसंस्था / नवीदिल्ली :
भारताला लागून असलेल्या नेपाळ या देशात १०० हून जास्त भारतीय नोटांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आता नेपाळ मध्ये २००, ५०० आणि २ हजार रूपयांचा भारतीय नोटा चालणार नाहीत. नेपाळ सरकारने कॅबिनेटच्या काल १३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. 
नोव्हेंबर २०१६ मध्ये भारतात ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. यानंतर अरबो रूपये नेपाळमध्ये फसले. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. नेपाळ चे सुचना आणि प्रसारण मंत्री गोकुल प्रसाद बसकोटा यांनी म्हटले आहे की, १०० रूपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या नोटा नागरीकांनी बाळगू नयेत. या नोटांना अमान्य करण्यात आले आहे. फक्त १०० रूपयांच्या भारतीय नोटा व्यवहारात वापराव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.

   Print


News - World | Posted : 2018-12-14


Related Photos