महत्वाच्या बातम्या

 लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे मोतीबिंदु शिबीर संपन्न


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : लोक बिरादरी प्रकल्प दवाखाना हेमलकसा येथे आज १८ ऑक्टोबर २०२२ रोजी मोतीबिंदु शिबीर पार पडले. या शिबीरात एकुण २० रूग्णांवरती मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली. गडचिरोली येथील डॅा. अद्वय अप्पलवार हे गेली ७ वर्षापासुन लोक बिरादरी प्रकल्प दवाखाना हेमलकसा यांच्या सहयोगातुन मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर घेतात. आजपर्यंत भामरागड येथील आदिवासी दुर्गम भागातील सरासरी १ हजार रूग्णांना नवीन दृष्टी मिळाली आहे. डॅा. दिगंत आमटे व डॅा. अनघा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश बुरडकर व लोक बिरादरी प्रकल्प दवाखाना, हेमलकसा येथील आरोग्य कर्मचार्यांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडले. यावेळेस डॅा. दिगंत आमटे यांनी भामरागड तसेच आदिवासी भागातील गरजु रूग्णांनी आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे अवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos