महत्वाच्या बातम्या

 पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांची परिचय केंद्राला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / 
नवी दिल्ली : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला आज भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली. दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या पुणे  श्रमिक पत्रकार संघाचे समन्वयक संदीप पाटील व गणेश खळदकर व दोन महिला पत्रकारांसह 15 सदस्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी औपचारिक वार्तालाप झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविद्यपूर्ण माहिती प्रभारी उपसंचालक अरोरा यांनी दिली. महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच, दिल्ली स्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची विस्तृत माहितीही अरोरा यांनी दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे  तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसअँप ग्रुप आदीं समाज माध्यमातून शासनाची प्रभावीपणे करण्यात येणारे प्रसिध्दी विषयक कार्याची अरोरा यांनी माहिती दिली. सर्व पत्रकार संदस्यांना यावेळी लोकराज्य अकांच्या प्रती भेट स्वरुपात देण्यात आल्या.





  Print






News - Rajy




Related Photos