बचतगटांची चळवळ अधिक गतिमान करणारा ‘नवतेजस्वीनी’ प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई 
: राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडीत उपक्रमांची  अंमलबजावणी अधिक विस्तारीत स्वरुपात करण्याच्या उद्देशाने राज्यात ‘नवतेजस्वीनी - महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ राबविण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पुढील सहा वर्षाच्या कालावधीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या  वतीने महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) हा प्रकल्प राबविण्यात येईल.
आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) सहाय्यित हा प्रकल्प राबविण्यासाठी आयफॅडकडून 335.40 कोटी रुपये इतका निधी कर्जरुपाने उपलब्ध करुन देण्यास तसेच हा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशासकीय खर्चासाठी 193.15 कोटी रुपये इतका निधी राज्य शासनाचा हिस्सा म्हणून उपलब्ध करुन देण्यास
मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. योजनेवरील खर्चाची तपशीलवार परिगणना आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या तांत्रिक सहाय्याने करण्यात येऊन 528
कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या मर्यादेतच अंतिम परिगणनेस विहित  मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.
महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता बचतगटांची मालकी लोकांकडे हस्तांतरित करणे, स्थायी विकासासाठी लोकांची संस्था उभारणे, त्यांना विकसित व बळकट करणे, महिलांची क्षमता कौशल्य विकसित करणे, उपजिविकेच्या साधनांवर त्यांची  मालकी प्रस्थापित करणे, महिलांचा राजसत्तेत, निर्णय प्रकियेत कृतीशील  सहभाग वाढविणे, व्यवस्थापन माहिती पद्धती विकसित करणे, गटांना बँकेशी जोडून देणे यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयफॅड) सहाय्यित हा  प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सध्या तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याची मुदत नुकतीच संपली आहे. आता आयफॅडच्या सहयोगाने नवतेजस्विनी हा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 स्वयंसहाय्य बचतगटातील सदस्यांना उपजिविकेच्या माध्यमांची संधी मिळणे,  त्यांच्या सुरु असलेल्या व्यवसायामध्ये मुल्यवृद्धी होणे व त्याद्वारे त्यांना उत्पन्नवृद्धीचा लाभ मिळणे, स्थानिक बाजारपेठ व्यतिरिक्त  विस्तारीत स्वरुपाच्या मार्केंटिंग नेटवर्कमध्ये सहभागी होण्यासाठी वेअर हाऊसिंगसारख्या सपोर्ट सिस्टीमशी महिलांना जोडले जाणे या दृष्टिकोनातून CMRC ला सहाय्य करणे अत्यंत गरजेचे आहे. याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे  साध्य अधिक वृद्धींगत करणे व दारिद्र्य निर्मूलन आणि महिला सक्षमीकरणाशी निगडीत उपक्रमांची अंमलबजावणी अधिक विस्तारीत स्वरुपात करणे याकरिता 
 ‘नवतेजस्वीनी - महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ सन  2018-19 ते सन 2023-24 या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार
आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-12-13


Related Photos