महत्वाच्या बातम्या

 ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा : मंत्री संदिपान भुमरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : 
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना ता. पैठण येथील भाग - १ टप्पा-२ कालवा क्र.१, कालवा क्र- २ खेर्डा - पाचोडा उपसा सिंचन योजनासाठी कालवा क्रमांक एक वरील आठ गावांच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाबाबत तसेच कालवा क्रमांक दोन वरील सोलनापूर - राहटगावच्या भूसंपादन मोबदल्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्यात यावा, असे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना ता. पैठण येथील भाग-१ टप्पा-२ कालवा क्र.१, कालवा क्र- २ उपसा सिंचन योजना बाबत आज रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुरत्न या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. मंत्री भुमरे म्हणाले की, खेर्डा - पाचोडा उपसा सिंचन योजनचे सर्वेक्षण करण्याची निविदा निघाली असून याचे अंदाजपत्रक दोन महिन्यात निघून पुढील 4 महिन्यात ही निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

ब्राह्मगव्हाण सिंचन योजनांसाठी पाणी सोडणाऱ्या कामगारांचे वेतन वेळेवर देण्यात यावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या सिंचन प्रकल्पात जिथे रस्ते क्रॉसिंग असतील तिथे रस्ते न खोदता आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता घेऊन काम करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच भाग 1 टप्पा-2 मधील तोडुळीतील योजना एप्रिल अखेरपर्यंत कार्यान्वित कारण्याचे निर्देश दिले.





  Print






News - Rajy




Related Photos