महत्वाच्या बातम्या

 आदिवासी भागात स्पर्धा परीक्षेची तयारी आता यूट्यूबद्वारे होणार


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : राजे विश्वेश्वराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे अनेक वर्षापासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा केंद्राची स्थापना केलेली आहे. स्पर्धा परिक्षा केद्रप्रमुख म्हणून अनेक वर्षापासून प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे हे आदिवासी विद्यार्थीसाठी स्पर्धा परिक्षेसाठी आणि रोजगारासाठी त्याच्यात आवड निर्माण करुण स्पर्धा परिक्षेची भीती त्याच्यातुन नष्ट करतात. आणि त्यांना स्पर्धा परिक्षेसाठी वेगवेगळे प्रयोग करुण स्पर्धची तयारी करतात. कोरोना काळात विद्यार्थ्यांना मोबाईल व्दारे मीस कॉल देऊन स्पर्धा परिक्षेची तयारी केली. हा डोगराळ आदिवासी आणि दुर्गम भाग असल्यामुळे चागल्या प्रकारचे मार्गदर्शक या भागात येण्यास तयार नसतात. म्हणून केद्रप्रमुख डॉ. कैलास व्हि.निखाडे याने केंद्रामध्ये यूट्यूब व्दारे आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केलेली आहे. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमराज लाड उपस्थित होते तर प्रमुख प्राहुणे म्हणून स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा माजी विद्यार्थी रुपेश सुरजागडे तसेच प्रा.डॉ. प्रमोद घोनमोडे, प्रा.डॉ. संतोष डाखरे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन कु. कविता हलदर तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कु. सुप्रिया मंडल यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos