के. चंद्रशेखर राव यांनी दुसऱ्यांदा घेतली तेलंगण च्या मुख्यमंत्रिपदाची शपथ


वृत्तसंस्था / हैद्राबाद :  तेलंगण विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेल्या तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेलंगण राज्याच्या स्थापनेनंतर राव सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. राज भवनमध्ये झालेल्या सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. 
 सहा महिन्यांपूर्वीच तेलंगण विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकांसमवेत विधानसभा निवडणुका घेतल्यास राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतील आणि त्यामुळं नुकसान सोसावं लागेल, असं राव यांना वाटत होतं. त्यामुळं मुदतीपूर्वीच त्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राव यांच्या पथ्यावर पडला आणि विधानसभा निवडणुकीत तेलंगण राष्ट्र समितीनं दणदणीत विजय मिळवला. 
तेलंगणमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळवून सत्तेत वापसी करणाऱ्या तेलंगण राष्ट्र समितीच्या खात्यात राज्यातील एकूण मतांपैकी ४६.९ टक्के मते पडली. राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसनं राज्यात ८८ जागांवर विजय मिळवला आहे.   Print


News - World | Posted : 2018-12-13


Related Photos