महत्वाच्या बातम्या

 संविधान जागर प्रबोधन कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर येथील योग नृत्य परिवार आणि संविधान जागर समिती तर्फे १९ मार्च २०२३ आझाद गार्डन योग नृत्य परिवार तर्फे संविधान जागर प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.

सदर कार्यक्रमात संविधान जागरचे अशोक घोटेकर आणि प्रा. व्हेलेकर उपस्थित होते. सुरुवातीला दोन्ही पाहुण्यांचे स्वागत केंद्र प्रमुख संतोष पिंपळकर आणि धनंजय तावाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर सर्वांनी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

प्रास्ताविक अशोक घोटेकर यांनी तर संविधानातील धर्मनिरपेक्ष मुल्यावर प्रा. व्हेलेकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार धनंजय तावाडे यांनी केले. कार्यक्रमाला योग नृत्य परिवार आझाद गार्डन ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos