महत्वाच्या बातम्या

 भंडारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : साकोलीपासून काही अंतरावर रविवारला पहाटे राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला.

सादर घटना सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. महामार्ग ओलांडून हा बछडा उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असता अज्ञात ट्रकने त्याला चिरडले. डोक्यावरून ट्रकचा टायर गेल्याने जागीच बछड्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी वन विभागाला याची माहिती दिली. असता वन अधिकाऱ्यांनी बछड्याचे शव ताब्यात घेऊन पंचनामा केला. बछडा अंदाजे १ वर्षाचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.





  Print






News - Bhandara




Related Photos