प्रतिज्ञापत्रात दोन खटल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने या आधी फडणवीस यांना दिलासा दिला होता. 
अ‍ॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका सादर केली आहे. २०१४ मध्ये फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपविल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील असून त्यातील एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा गुन्हा फसवणुकीचा असल्याचं म्हटलं आहे. फडणवीस यांनी दोन्ही गुन्हे लपवून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावाही उके यांनी केला असून त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, उके यांची याचिका दाखल करून घ्यायची की नाही याची विचारणा करणारी ही नोटीस असून याच प्रकरणात उच्च न्यायालयाने फडणवीस यांना आधीच दिलासा दिलेला आहे.   Print


News - World | Posted : 2018-12-13


Related Photos