महत्वाच्या बातम्या

 सखी वन स्टॉप सेंटरचे जनजागृती कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे सर्वांना समान न्याय अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या समन्वयाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

१७ मार्च २०२३ रोजी आयोजीत या कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात अंतर्गत जनहीत बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, येणापूर यांच्या पथनाट्यातून गावकऱ्यांना कौंटूबिक हिंसाचार कायदा, बालविवाह, स्त्रीभृणहत्या व हुंडाबळी या विषयावार पथनाट्य सादर करीत सखी वन स्टॉप सेंटर ची माहिती देवून माहितीपर पत्रकांचे वितरण करण्यात आले.

केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर ही कोणत्याही हिंसाचारातील पीडीत महिला व मुलींना वैद्यकीय मदत, समुपदेशन, कायदेविषयक मदत, पोलीस मदत आपतकालीन सेवा तथा तात्पुरता निवास सेवा व पुनर्वसन अशा अनेक सेवा एका छताखाली उपलब्ध करुन देणारी एक विशेष योजना आहे अशी माहिती या कार्यक्रमा अतंर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रकाश भांदककर व बाल कल्याण समिती अध्यक्षा वर्षा मनवर यांच्या मार्गदर्शनात केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार यांनी उपस्थितांना दिले. तसेच अशी पीडीत महिला व मुली आढळल्यास तात्काळ १८१ महिला हेल्पलाईन,०७१३२-२९५६७५ व ९६३७९७६९१५ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली चे सचिव राजेंद्र पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वर्षा मनवर यांनी आपल्या मार्गदर्शनातुन महिलांविषयक कायदे व योजनांची माहिती गावकऱ्यांना दिले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मार्कंडादेव चे सरपंच, मार्कंडादेवस्थान समितीचे सचिव यांचे महत्वपुर्ण सहकार्य लाभले तथा मोनिका वासनिक, वन स्टॉप सेंटर गडचिरोली व रवींद्र बंडावार, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांनी परिश्रम घेतली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos